
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा ऑनलाईन निकाल 16 जुलै रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. ऑनलाईन निकालात विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पाहता येईल तसेच त्या माहितीची प्रिंट देखील काढता येईल.
उत्तरपत्रिकांच्या पूनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी प्रथम उत्तरर्थ्यांची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. तसेच या परीक्षेत सर्व विषयांसह पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुढील दोन संधी गुण सुधार योजनेतंर्गत उपलब्ध असणार आहेत, असे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले. गुणपडताळणीसाठी 17 ते 27 जुलैपर्यंत तसेच उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी 5 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.
येथे पाहा निकाल
आपली प्रतिक्रिया द्या