महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत जनता कर्फ्यू, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

2376

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेला जनता कर्फ्यूची मुदत रविवारी रात्री 9 वाजता संपणार होती. मात्र आता हा कर्फ्यु 31 मार्च पर्यंत वाढविण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आाहे.

‘आज पाळण्यात आलेला कर्फ्यु सोमवार सकाळी 5 पर्यंत चालेल व त्यानंतर या कर्फ्युचा दुसरा टप्पा सुरू होणार असून तो 31 मार्चपर्यंत असेल. 31 तारखेपर्यंत राज्यात कलम 144 लागू करण्यात आले असून 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये. या काळात बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिस, भाजीपाला, दूध, फळे, हॉस्पिटल, मीडिया, फोन ,इंटरनेट सेवा, पेट्रोलियम, ऑइल, वीज अशा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. त्यामुळे कुणीही जीवनावश्यक वस्तूंसाठी गर्दी करू नये. तसेच या वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल’, असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले

मीच माझा रक्षक
या कर्फ्युच्या काळात नागरिकांनी मंदिरं व धार्मिक ठिकाणी गर्दी करू नये. मीच माझा रक्षक हा संदेश पाळावा, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या