‘मनसे’चा मोर्चा ‘सीएए’ समर्थनार्थ नाही, बांगलादेशींना हाकलण्यासाठी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘माझं कायद्याला समर्थन नाही. तसेच मनसेचा 9 फेब्रुवारीचा मोर्चा हासुद्धा या कायद्याच्या समर्थनार्थ नाही, तर घुसखोर पाकिस्तानी आणि बांगलादेशींना समर्थन देणाऱया मोर्चाच्या विरोधात हा मोर्चा आहे’ असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आज पत्रकारांना सांगितले.

राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱयांच्या शंकेचे निरसन केले. ‘मनसेचा मोर्चा हा सीएएच्या समर्थनार्थ नाही, तर घुसखोर पाकिस्तानी आणि बांगलादेशींना समर्थन देणाऱया मोर्चाच्या विरोधात हा मोर्चा आहे. सीएए आणि एनआरसीबाबत चर्चा होऊ शकते, मात्र समर्थन नाही’, असे राज ठाकरे यांनी सांगितल्याचे नांदगावकर म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या