पालघर जिलह्यातील भूमी सेनेचे संस्थापक आणि आदिवासी नेते काळूराम धोदडे यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते काका या नावाने ओळखले जात होते. आदिवासींना त्यांचे हक्क आणि जमीनमिळावी, यासाठी त्यांचे अमूल्य योगदान होते. त्यांच्या निधनाने आदिवासी चळवळीचा आधारस्तंभ आणि आदिवासींच्या हक्क्साठी झगडणारा नेता हरपला आहे. सुमारे पाच दशके ते आदिवासी चळवळीत सक्रिय होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
जल, जंगल, जमीन यावर आदिवासी, भूमिपुत्र शेतकऱ्यांचे अधिकार आहेत आणि त्यासाठी लढणारे भूमीसेना व आदिवासी एकता परिषदचे संस्थापक काळूराम धोदडे उर्फ काका यांनी शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास करण्यात येणार आहे.
आदिवासींच्या हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. राष्ट्रीय प्रकल्पांच्या उभारणी मुळे पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधव व भूमिपुत्र उध्वस्त होत असल्याकडे त्यांनी आंदोलनाद्वारे शासनाच्या निदर्शनास आणून दिले. पाच दशकांपेक्षा अधिक काळ ते आदिवासी बांधवांकरिता चळवळीत सक्रिय होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर शुक्रवारी रात्री त्यांचे निधन झाले.