राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भाजपने त्यांच्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आता इतर पक्षांची उमेदवारी कधी जाहीर होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तसेच महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबतच्या घडामोडींची चर्चाही राजकीय वर्तुळात होत आहे. आता जागावाटप आणि महाविकास आघाडीतील संबंधांबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले नवी दिल्लीत बैठकीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसची यादी मंगळवारी जाहीर होणार असल्याचे सांगितले. विदर्भातील जागांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये काहीही वाद नाही. माध्यमांनी उगीच आमच्यात भांडण लावू नये, असे त्यांनी म्हटले आहे. मंगळवारी संध्याकाळी तिन्ही पक्षाचे नेते जागा वाटप जाहीर करतील. महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रियंका गांधी वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. त्या महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार आहेत. तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी महाराष्ट्रात प्रचार करणार आहे. शिवसेनेसोबत आमच्यात कोणतेही वाद नाहीत. थोड्याफार प्रमाणात असलेल्या जागाबाबत लवकरच तोडगा निघेल, असे काँग्रेसचे महाराष्ट्राताली प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.