दिलासादायक! राज्यात आज एकाच दिवशी विक्रमी 13,348 रुग्ण कोरोनामुक्त

1707
प्रातिनिधिक फोटो

राज्यात आज आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने 13 हजार 348 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात कोरोनाचे एकूण 3 लाख 51 हजार 710 रुग्ण बरे झाले आहेत. आज देखील नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज 12 हजार 248 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण 68.25 टक्के एवढे आहे. सध्या 1 लाख 45 हजार 558 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज देखील राज्यभरात सर्वाधिक 78 हजार 70 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 27 लाख 25 हजार 090 नमुन्यांपैकी 5 लाख 15 हजार 332 नमुने पॉझिटिव्ह (18.91 टक्के) आले आहेत. राज्यात 10 लाख 588 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 34 हजार 857 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 310 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.45 टक्के एवढा आहे.

आकडेवारी –
बाधित रुग्ण – 5,15,332
बरे झालेले रुग्ण – 3,51,710
मृत्यू – 17,757
इतर कारणांमुळे झालेले मृत्यू – 307
ॲक्टिव्ह रुग्ण – 1,45,558

आपली प्रतिक्रिया द्या