
कोरोनामुळे बंद असलेल्या शाळांची घंटा तब्बल दहा महिन्यांनंतर पुन्हा वाजणार आहे. येत्या 27 जानेवारीपासून राज्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागास परवानगी दिली आहे.
विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याशी पुरेशी काळजी घेऊनच शाळा सुरू कराव्यात, अशी सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली.
जिल्ह्या-जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेऊनच शाळा सुरू करता येऊ शकते का याविषयी निर्णय घेतला जाणार आहे. कुठल्या जिल्ह्यात शाळा सुरू होणार हे आता सांगता येणार नाही.
विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे हमीपत्र घेणे प्रत्येक शाळेला बंधनकारक आहे. पालकांच्या परवानगीशिवाय विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश मिळणार नाही.
शाळा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांची कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे. पुढील काही दिवसांत शाळा सुरू करण्यापूर्वी एसओपी जाहीर केल्या जाणार आहेत.
एकूण शाळा – 1,06,491
पाचवी – 19,98,966
सहावी – 19,74,024
सातवी – 19,50,828
आठवी – 19,23,182
एकूण – 78,47,000
































































