1 लाख 90 हजार कामगारांची 826 विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ राज्यात पाठवणी – गृहमंत्री अनिल देशमुख

702

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या 21 परराज्यातील जवळपास 11 लाख 90 हजार 990 कामगारांची पाठवणी 826 विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

22 मार्च पासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. अनेक राज्यातील कुशल, अकुशल कामगार महाराष्ट्रात लॉकडाऊनने अडकून पडले होते. त्यांच्या विनंतीनुसार लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून 826 ट्रेनने 11 लाख 90 हजार 990 कामगार व मजुरांची पाठवणी त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली. या परप्रांतीय कामगारांना पाठविण्याचा सर्व तिकीट खर्च महाराष्ट्र शासनाने केला असून यासाठी सुमारे 100 कोटी रुपयांचा खर्च आला.

826 विशेष श्रमिक ट्रेन

राज्याच्या सर्व भागातून 1 मे पासून 2 जूनपर्यंत विविध रेल्वेस्टेशन वरून 826 विशेष श्रमिक ट्रेनद्वारे या सर्वांना पाठविण्यात आले. यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश (450), राजस्थान(20), बिहार(177), कर्नाटक(6), मध्य प्रदेश (34), प.बंगाल(49), जम्मू(5), ओरिसा(17), छत्तीसगढ(6), आसाम(6) उत्तराखंड(3 ) , झारखंड(32 ), आंध्र प्रदेश(3), गुजरात (4), हिमाचल प्रदेश (1 ), त्रिपुरा(1 ), तामिळनाडू (5 ), मणिपूर (3 ), केरळ(2), तेलंगणा (1), मिझोराम (1) या 21 राज्यांचा समावेश आहे.

35 रेल्वे स्टेशन व 826 ट्रेन

राज्यातील विविध रेल्वे स्थानकांवरून या कामगारांना त्यांच्या-त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले. यात भिवंडी 11, डहाणू 1, कल्याण 14, पनवेल 45, ठाणे 37, लोकमान्य टिळक टर्मिनस 155, सी.एस.एम.टी. 137, वसई रोड 38, पालघर 12, बोरिवली 72, बांद्रा टर्मिनस 65, अमरावती 5, नगर 9, मिरज 10, सातारा 14, पुणे 78, कोल्हापूर 25, नाशिक रोड 8, नंदुरबार 5, भुसावळ 3 , साईनगर शिर्डी 5, जालना 3, नागपूर 14, संभाजीनगर 12 , नांदेड 3, कुर्डूवाडी 1, दौंड 4, सोलापूर 4, अकोला 4, वर्धा 1, उरळी 12, पंढरपूर 4, सिंधुदुर्गनगरी 7, रत्नागिरी 6 चिपळूण 2 या 35 स्टेशन वरून उपरोक्त 826 श्रमिक विशेष ट्रेन सोडण्यात आल्या.

आपली प्रतिक्रिया द्या