राज्यात 10 हजार कोरोनामुक्त; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66.76 टक्क्यांवर

517

राज्यात बरे होणाऱया रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज 10 हजार 906 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 10 हजार 483 नवीन रुग्णांचे निदान झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66.76 टक्के आहे. राज्यभरात 3 लाख 27 हजार 281 रुग्ण बरे झाले असून 1 लाख 45 हजार 582 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात दिवसभरात 300 मृत्यूंची नोंद झाली असून मृत्यूदर 3.49 टक्के आहे. मृत्यूंमध्ये मुंबई मनपा-45, ठाणे- 5, ठाणे मनपा-10, नवी मुंबई मनपा-4, कल्याण डोंबिवली मनपा-6,उल्हासनगर मनपा-2, भिवंडी निजामपूर मनपा-4, मीरा भाईंदर मनपा-3,वसई-विरार मनपा-14, रायगड-9, पनवेल मनपा-19, नाशिक-2,नाशिक मनपा-23, मालेगाव मनपा-1, नगर-4, नगर मनपा-1, धुळे-2, धुळे मनपा-1, जळगाव-5, जळगाव मनपा-1, पुणे-17, पुणे मनपा-35, पिंपरी चिंचवड मनपा-18, सोलापूर-5, सोलापूर मनपा-2, सातारा-6, कोल्हापूर-6, सांगली-1, सांगली मिरज कुपवाड मनपा-2, रत्नागिरी-3, संभाजीनगर-2, संभाजीनगर मनपा-2, लातूर-2, लातूर मनपा-3, धाराशीव-1, बीड-2, नांदेड-5, नांदेड मनपा-1, अकोला मनपा-1, अमरावती-1, अमरावती मनपा-4, बुलढाणा-3, वाशिम-1, नागपूर-4, नागपूर मनपा-11 तर अन्य राज्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत 1,236 कोरोनामुक्त
मुंबईत आज कोरोनाचे 862 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 45 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 1,236 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणार्यांची संख्या आता 93 हजार 897 वर पोहोचली आहे. मुंबईत 45 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 6 हजार 690 झाली आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या कमी होऊन आता 20 हजार 143 इतकी आहे.

कोरोनाने मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 138 जणांचा मृत्यू
कोरोनाच्या प्रादुर्भावाने आतापर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या एकूण 138 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रेल्वे रुग्णालयात 143 जण उपचार घेत आहेत. तर 1,225 जण कोरोनातून पुर्णपणे बरे झाले आहेत. बरे होण्याच्या r टक्केवारीचे प्रमाण 80 टक्क्यांपर्यंत आले आहे. रेल्वेच्या कामगारांसोबत त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांचादेखील समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या