महाराष्ट्र स्टेट नर्सेस युनियनचा शिवसेनेला पाठिंबा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र स्टेट नर्सेस युनियनने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-मशाल चिन्ह) पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. यासाठी सर्व सदस्यांच्या संमतीने ठराव मांडण्यात आला.

लोकसभा निवडणुकीमुळे देशवासीयांचे आणि देशाचे भविष्य ठरणार आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असून यात महाराष्ट्र स्टेट नर्सेस युनियनचाही खारीचा वाटा असावा, यासाठी संघटनेने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र स्टेट नर्सेस युनियन ही महाराष्ट्रातील नोंदणीकृत नार्ंसग संघटना असून नर्सेसच्या न्याय हक्कासाठी सदैव लढत असते. महाराष्ट्रातील विविध रुग्णालयांतील कार्यरत असलेले नार्ंसग स्टाफ आमच्या संघटनेचे सदस्य आहेत. आमच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला आहे, अशी माहिती युनियनचे अध्यक्ष शुभानंद शिंदे आणि सरचिटणीस शमशाद तुर्की यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.