राज्य टेबल टेनिस स्पर्धा 6 जुलैपासून ऐरोलीत रंगणार

महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना आणि ठाणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली स्पोर्ट्स संघटनेच्या वतीने येत्या 6 ते 10 जुलै 2025 दरम्यान मास्टर प्रतीक तुलसानी पहिल्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत एकंदर 12 गट खेळविले जाणार असून 11, 13, 15, 17 आणि 19 वर्षांखालील मुला-मुलींचे एकूण दहा गट या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तसेच पुरुष आणि महिला गटात सर्व वयोगटातील खेळाडूंना खेळण्याची संधी लाभले. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी 30 जूनपर्यंत 9136346460 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ऐरोली स्पोर्ट्स संघटनेच्या  वतीने करण्यात आले आहे.