बॅगवाल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही महाराष्ट्र वाट पाहतोय, संजय शिरसाटांवरून रोहित पवार यांचा मिंधेंवर निशाणा

मिंधे गटाचे संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात त्यांच्या रुममध्ये एक पैश्यांनी भरलेली बॅग होती. या बॅगवाल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही महाराष्ट्र वाट पाहतोय असा निशाा रोहित पवार यांनी मिंध्यांना लगावला आहे.

एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री मा. अजितदादा दाखवत असलेली ही कठोरता सरकारमधील इतर मित्रपक्ष दाखवतील का? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.

बॅगवाल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही महाराष्ट्र वाट पाहतोय, त्यांच्यावर देखील नेतृत्वाला कारवाई करावीच लागेल. बॅगवाल्या मंत्र्यांवर कारवाई करायची हिंमत मा. शिंदे साहेब कधी दाखवणार? असेही रोहित पवार म्हणाले.