
जालन्यातले आदर्श राऊत हे कश्मीरमध्ये गेले होते. तेव्हा त्यांनी स्थानिक व्यक्तीने तुम्ही हिंदू आहात का? इथले वाटत नाही अशी विचारणा केली. त्याच्या दोन दिवसांनंतरच पहलगाममध्ये हल्ला झाला. घरी आल्यावर त्यांना ही गोष्ट आठवली आणि त्यांनी राष्ट्रीय तपास संस्थेला ई मेल करून ही बाब कळवली.
आदर्श राऊत म्हणाले की, बैसरन खोऱ्यात मी फिरायला गेलो होतो. तेव्हा भूक लागली म्हणून मी एका स्टॉलवर मॅगी खात होतो. तेव्हा एका व्यक्तीने त्यांना विचारलं की तुम्ही हिंदू आहात का इथले नाही वाटत. त्यानंतर त्या व्यक्तीने त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीला आज फार गर्दी नाही असे सांगितले आणि निघून गेला.
त्यानंतर दोन दिवसांनी पहलगाममध्ये हल्ला झाला आणि त्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. राऊत यांनी राष्ट्रीय तपास संस्थेला ई मेल करून ही बाब कळवली.