महात्मा गांधीच्या चष्माचा ब्रिटनमध्ये लिलाव; 6 हजार पौंडची बोली

731

महात्मा गांधी यांनी वापरलेल्या गोल्ड प्लेटेंड चष्माचा ऑनलाईन लिलाव ब्रिटनमध्ये होत आहे. हा गोलाकार फ्रेमचा चष्मा महात्मा गांधी यांना 1900 च्या दशकात भेट म्हणून मिळाला होता. लिलावात या चष्माची बोली 10 हजार ते 15 हजार पौंडपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोल फ्रेमचा चष्मा ही महात्मा गांधी यांची ओळख होती. त्यामुळे या चष्माला ऐतिहासिक महत्त्व आहे.

या चष्माला अनोखे असे ऐतिहासिक महत्त्व आहे, असे दक्षिण पश्चिम इंग्लंडमधील ब्रिस्टल ऑक्शन हाऊसने म्हटले आहे. चष्मा विक्रेत्यांना याबाबतची माहिती मिळाल्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले, असे या लिलावाचे आयोजक अॅण्डी स्टोव्ह यांनी सांगितले. महात्मा गांधी यांच्यासारख्या व्यक्तीने वापरलेल्या ऐतिहासिक वस्तूचा लिलाव ही अनोखी बाब असल्याचे ते म्हणाले.

या चष्माच्या लिलावासाठी 6 हजार पौंडची बोली लागल्याचे स्टोव्ह यांनी सांगितले. हा चष्मा आपल्या काकांनी बनवल्याचे चष्मा विक्रेत्यांच्या वडिलांनी सांगितले. आपले काका 1910 ते 1930 या काळात दक्षिण आफ्रिकेत होते. त्यामुळे महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी हा चष्मा वापरल्याची शक्यता स्टोव्ह यांनी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या