वीज निर्मिती करणाऱ्या कंपनीवर काळोखाचे सावट

636
electricity

राज्यातील उजेड देणा-या वीज निर्मिती कंपनीवर काळोखाचे सावट पसरले आहे. कोरोना संकटाने राज्यातील वीज निर्मितीपुढे अभूतपूर्व अडचणी उभ्या केल्या आहेत. जनता कर्फ्यु, संचारबंदी, देशव्यापी लॉकडाऊनमुळे राज्यातील व्यवहार ठप्प आहेत. केवळ घरगुती मागणी कायम आहे. व्यावसायिक वीज मागणी महानिर्मितीसाठी महत्वाची ठरते. राज्यातील उद्योग-कारखाने बंद असल्याने औष्णिक-जल वीज निर्मिती ठप्प झाली आहे. चंद्रपूर वीज केंद्र तर 36 वर्षात प्रथमच मागणी नसल्याने बंद करावे लागले.

ताज्या माहितीनुसार या केंद्रात 210 मेगावॅटचा एक संच सुरू करण्यात आला आहे. वीज मागणी वाढल्याने नव्हे, तर राज्यातील इतर संचात बिघाड पडल्याने हा संच सुरू करण्यात आला आहे. यासोबतच याच केंद्रातील 500 मेगावॅट चा एक संच आगामी काही तासात कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. वीज निर्मितीचे हे गणित आता फक्त मागणीवर विसंबून आहे. राज्याची आजची मागणी 16 हजार मेगावॅट एवढी आहे. एरवी याच काळात ही मागणी 26 हजार मेगावॅट एवढी असते. मागणी नाही त्यामुळे निर्मिती ठप्प आणि रोजगार नाही त्यामळे वीजबिल भरणे बंद, या दुष्टचक्रात विजेचे अर्थकारण दीर्घकाळपर्यंत अडकणार आहे. उद्योग बहुल राज्य असलेल्या महाराष्ट्रात महाजनकोला कोट्यवधी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उद्योग बंदी आणि कोरोना लॉकडाउनमुळे वीज क्षेत्राला घातक शॉक बसण्याचा अंदाज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या