बॉलिवूड अभिनेत्रीचे लग्न मोडले, दोन वर्षांपूर्वी झाला होता साखरपुडा

2371

बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्ये आयटम साँग केलेली व सलमान खानसोबत चित्रपटामध्ये झळकलेली अभिनेत्री मेहेक चहल हिचे लग्न मोडले आहे. मेहेकने दोन वर्षांपूर्वी अभिनेता अश्मित पटेलसोबत साखरपुडा केला होता. 2019 च्या अखेरपर्यंत ते लग्न देखील करणार होते. मात्र आता त्यांनी त्यांचे नाते संपुष्ठात आल्याचे जाहीर केले आहे.

ashmit-and-meheck-1

मेहेक व अश्मीत या दोघांनी ऑगस्ट 2017 मध्ये साखरपुडा केला होता. या दोघांची मैत्री बिग बॉसच्या एका पार्टीत झाली होती. अश्मीत बिग बॉसच्या चौथ्या सिझनमध्ये होता तर मेहेक पाचव्या सिझनमध्ये अखेरच्या तिघांमध्ये आली होती. हे दोघे गेले पाच सहा वर्ष एकत्र होते असे बोलले जाते. ‘मी अश्मीतसोबतचे नाते तोडले असून मला हा निर्णय घ्यावा लागला व या नात्यातून बाहेर पडावे लागले’, असे मेहेकने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या