धोनीच्या निवृत्तीबाबत मॅनेजरचा मोठा खुलासा

717

हिंदुस्थानचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीवरून गेल्या काही दिवसंपासून जोरदार चर्चा सुरू आहे. नुकताच धोनीने त्याचा 39 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसानंतर धोनीच्या मॅनेजरने त्याच्या निवृत्ती बाबत मोठी घोषणा केली होती. महेंद्र सिंग धोनी याचा सध्या निवृत्ती घेण्याच्या कुठलाही विचार नाही. त्याला अजूनही क्रिकेट खेळायचे आहे. आयपीएल मध्ये खेळण्यासाठी तो तयारी करत होता . लॉकडाउनच्या आधी तो सराव करत होता.’ असे धोनीचा मॅनेजर व मित्र असलेल्या दिवाकर याने प्रसार माध्यमांना सांगितलं.

आयपीएल’च्या 13व्या सत्रात चमकादार कामगिरी करून ‘टीम इंडिया’त पुनरागमन करण्यासाठी महेंद्रसिंग धोनीने कंबर कसली होती. ‘टी- वल्र्डकप’मध्ये हा धुरंधर क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करेल, अशी चर्चा होती. मात्र, कोरोनामुळे देशात टाळेबंदी करावी लागल्याने आयपीएल स्पर्धा स्थगित करावी लागली. धोनीची सोनेरी कारकीर्द बघता, तो नक्कीच सचिन तेंडुलकरप्रमाणेच जल्लोषी निरोप समारंभाच्या सामन्याचा हकदार आहे. मात्र, सौरव गांगुली, युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग अशा महारथी खेळाडूंनाही निरोप समारंभाचा सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आता धोनीच्या बाबतीत काय घडते, ते देवच जाणे.

आपली प्रतिक्रिया द्या