‘माहूर गडाची माय रेणुका’ महोत्सव दिमाखात साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी एक पूर्णपीठ असलेले माहूरगड संस्थेतर्फे ‘माहूर गडाची माय रेणुका’ हा महाकवी संत विष्णुदासांच्या रसाळ रचनेवर आधारित संगीत महोत्सव नुकताच दिमाखात पार पडला. यात महाकवी संत विष्णुदास यांच्या रचना सादर केल्या. ज्येष्ठ महिला संगीतकार आनंदी विकास यांनी  संगीत दिलेल्या या रचनांनी रसिकांना भक्तिरसात तल्लीन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले होते, तर उद्घाटक म्हणून नांदेड-वाघाळा मनपा आयुक्त महेशपुमार डोईपह्डे, महाराष्ट्र होते. याशिवाय नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश पुमार यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. दैनिक ‘प्रजावाणी नांदेड’चे संपादक शंतनू डोईपह्डे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

जिल्हा न्यायाधीश तथा रेणुकादेवी संस्थान तीर्थक्षेत्र माहूरचे अध्यक्ष सुनीलजी वेदपाठक आणि किनवटचे सहायक जिल्हाधिकारीजेनीत चंद्रा दोंतुला यांनी या संगीत महोत्सवाचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमात वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांचाही सत्कार करण्यात आला. संगीतकार आनंदी विकास यांनी संगीत दिलेल्या महाकवी संत विष्णुदासांच्या रचना वैभव पांडे, वर्षा जोशी, शेफाली पुलकर्णी आणि सागर जाधव या गायक-गायिकांनी सादर केल्या. संवादिनीवर विकास देशमुख यांनी साथ दिली तर तबल्याची साथसंगत विवेक कयाळ यांची होती. साईड रिदम भगवानराव देशमुख, बासरी वादन विठ्ठल चुनाले, ढोलक धनंजय पंधारकर, पखवाज अमोल लाकडे, ऑक्टोपॅडवर अमोल देशपांडे आणि कीबोर्डवर ओंकार यांनी साथसंगत केली होती. या कार्यक्रमाचे निरूपण देविदास फुलारी आणि सुमेधा कुलकर्णी यांनी केले.