मोलकरणीने हातसफाई करून पळ काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. कांदिवली येथे राहणारे तक्रारदाराच्या घरी कामासाठी दोन महिला नोकर आहेत. एक महिला नोकर जेवण तर दुसरी ही साफसफाईचे काम करते. गेल्या आठवडय़ात दुसऱ्या मोलकरणीने गावी आईवडिलांचा वाद सुरू आहे. कोर्टात केस सुरू आहे असे सांगून ती निघून गेली.
दसऱ्याला तक्रारदार यांच्या पत्नीला साडी घालायची होती, मात्र त्यांना ती साडी मिळाली नाही. त्यामुळे तक्रारदार यांच्या पत्नीने त्या मोलकरणीला फोन करून विचारणा केली. तिने साडी माहीत नसल्याचे सांगून फोन कट केला. हा प्रकार त्यांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी घरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तेव्हा ती मोलकरीण ही तक्रारदार यांच्या पत्नीच्या बॅगमधून काही सामान नेत असल्याचे फुटेजमध्ये दिसले. त्यानंतर त्यांनी घरातील वस्तूची तपासणी केली तेव्हा घरातून कुंदन सेट, डायमंडच्या बांगडय़ा, घडय़ाळ आणि दोन लाख रुपये चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.