एका 14 वर्षीय विद्यार्थ्याला शाळेला दांडी मारायची होती. त्याला शाळेत जायचे नव्हते. त्यामुळे त्याने दिल्लीतील 3 शाळांना बॉम्बच्या धमकीचा मेल पाठवला. ही घटना दक्षिण दिल्लीतील ग्रेटर पैलास येथील समरफिल्ड शाळेत घडली. बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा पत्र आणि मेल आल्याने शाळेत एकच खळबळ उडाली.
शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बॉम्बचा शोध घेण्यात आला. बॉम्बसारखी कोणतीही वस्तू सापडली नाही. यानंतर पोलिसांनी याची चौकशी केली. यानंतर शाळेला पाठवलेला मेल हा 14 वर्षीय मुलाने पाठवल्याचे उघड झाले. या मुलाकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, मला शाळेत जायची इच्छा नव्हती. त्यामुळे मी धमकीचा मेल केला. पोलिसांनी धमकीच्या मेलप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.