माजलगाव येथे मोटारसायकल अपघातात तरुण ठार

814

माजलगाव शहरापासून जवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाला आहे. महामार्गावर उर्दु शाळेजवळ मंगळवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने पल्सर गाडीस ( एम एच 44 व्ही 9886 ) समोरासमोर धडक दिल्याने श्रीकांत ग्यानबा खाटीकमारे ( वय 30, रा.वारोळा ता.माजलगाव) हा तरुण जागीच ठार झाला.

आपले कापसाच्या जिनींगवरील काम आटोपून श्रीकांत पहाटे आपल्या गावाकडे मोटारसायकलवरून निघाला होता. वाटेत अज्ञात वाहनाला त्यास समोरून जोराची धडक दिल्याने मोटार सायकलचा अक्षरशः चुराडा होऊन श्रीकांत जागीच ठार झाला. त्याच्या पश्चात आई वडील,पत्नी, दोन मुलं , दोन भाउ असा परिवार आहे .

आपली प्रतिक्रिया द्या