अपहार प्रकरणात माजलगावचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यासह तिघांना अटक

1501

माजलगाव नगरपालिकेत अपहार प्रकरणी पोलिसांनी बुधवारी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना अटक केली आहे. चाऊस यांच्यासह मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे, लेखापाल अशोक कुलकर्णी यांनाही अटक करण्यात आली आहे. या आरोपींना येथील न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

14 व्या वित्त आयोगाच्या निधीबाबत सर्वच वित्तीय नियमांचे उल्लंघन व अपहार प्रकरणात त्या-त्या वेळच्या मुख्याधिकारी बी. सी. गावित, लक्ष्मण राठोड व हरिकल्याण येलगट्टे हे आरोपी आहेत. यातील राठोड यास यापूर्वी अटक झाली आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजता पोलिसांच्या क्राइम ब्रांचचे पथकाने नगर परिषद कार्यालयातुन नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना ताब्यात घेतले. त्यांना व मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे, अशोक कुलकर्णी यांना न्यायालयासमोर उभे केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. ए. वाघमारे यांनी 6 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या