माजलगाव मध्ये बडा मासा गळाला, उपविभागीय अधिकाऱ्यास 65 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले

प्रातिनिधिक फोटो

माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी यांनी वाळूची गाडी चालू द्यावी म्हणून 65 हजाराची मागणी केली होती ती देत असताना संभाजी चौक येथे देत असताना उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांच्या ड्राइवर कडे लाच देत असतांना जालना येथील लाच लुचपत अधिकाऱ्यास पकडल्याची घटना गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान घडली.

तालुक्यात गोदावरी नदीतून वाळूचे अवैध रित्या उपसा मोठ्या प्रमाणावर होतो यास वाळू माफियास पाठबळ देण्याचे काम काही स्वरूपात अधिकारी हे करत असतात माजलगाव तालुक्यालगत वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पलीकडे जालना जिल्ह्याची हद्द सुरु होते दोन्ही भागातून वाळूचा मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या उपसा होतो हा अवैध उपसा होऊ द्यावा यासाठी वाळू माफिया हे अधिकारी यांना लाचेची गोळी देऊन आपले उखळ पांढरे करतात त्याचाच भाग म्हणून या गोदावरी पात्रातून वाळूचा अवैधरित्या उपसा होऊ द्यावा म्हणून वाळू माफियांनी येथील उपविभागीय अधिकारी यांना सुमारे ६५ हजाराची लाच देऊ केली हि लाच त्यांच्या ड्रायव्हर मार्फत संभाजी चौकात घेत असताना त्यांना गुरुवारी रात्री ९ वाजता पकडण्यात आले.सदरील कारवाई जालना येथील लाच पथकातील अधिकारी निकाळजे यांच्या पथकामार्फत करण्यात आली आहे तर सदरील प्रकरणी उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड व त्यांचा चालक यांना पुढील कार्यवाही साठी बीड येथे नेण्यात आले आहे..

आपली प्रतिक्रिया द्या