माजलगावात 40 ऊसतोड कामगार क्वॉरंटाईन

1775

साखर कारखाना हंगाम आटोपून परत माजलगाव येथे आलेल्या 40 ऊसतोड कामगारांना शहराबाहेरील एका शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान हे कामगार सांगली जिल्ह्यातून आले असून त्यांच्या हातावर शिक्के मारलेले असल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान सोमवारी हातावर शिक्के असलेला एक इसम रस्त्यावर फिरत असताना पोलिसांनी त्याची घरी रवानगी केली.

माजलगाव शहरातील व परिसरातील काही कुटुंबातील लहान-मोठे चाळीस जण उसतोडीसाठी पश्चिम महाराष्ट्रात गेले होते. सोमवारी पहाटे तीन वाजता एका ट्रॅक्टरमध्ये हे सर्व माजलगाव शहरात दाखल झाले. त्यांना परभणी फाटीवर अडवून तपासणी केली असता त्यांच्या हातावर शिक्के दिसून आले. त्यामुळे या सर्व लोकांना तहसीलदार प्रतिभा गोरे यांचे आदेशानुसार शहराबाहेरील एका शाळेत निगराणी खाली ठेवण्यात आले. तेथे त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल परदेशी यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या