
व्हॉट्सअॅपवर तुम्ही देखील तुमच्या फोटोचे स्टिकर बनवू शकता. यासाठी मोबाईलमध्ये बॅकग्राउंड इरेजर आणि पर्सनल स्टिक ऑफ व्हॉट्सअॅप हे दोन अॅप्स डाउनलोड करावे लागतील.आधी बॅकग्राउंड इरेजर अॅप ओपन करून तुम्हाला तीन फोटो निवडावे लागतील. त्यानंतर एक-एक फोटो निवडू शकता. फोटो निवडल्यानंतर फोटोमागील भाग निघून जाईल. तिन्ही फोटोंना इरेज केल्यानंतर सेव्ह करा. यानंतर पर्सनल स्टिकर ऑफ व्हॉट्सअॅप अॅपला ओपन करा. अॅप ओपन झाल्यावर एक प्लस साइन दिसेल. येथे तिन्ही फोटो अपलोड करून अॅड बटनवर क्लिक करा. यानंतर स्टिकर बॉक्समध्ये तुम्हाला तुमच्या फोटोचे स्टिकर दिसेल.



























































