मानखुर्दमध्ये रिक्षाचालकाकडून प्रवाशाला पट्ट्याने मारहाण, पोलिसांकडून अटक

मानखुर्दमध्ये एका रिक्षाचालकाने प्रवाशाला बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली असून इतर दोन आरोपींचा शोध सुरू केला आहे.

मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या बाहेर शनिवारी सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी सोहेल अन्सारी हा तरुण रिक्षा पकडायला गेला. तेव्हा रिक्षाचालक अकील युनुस शेख याने सोहेलकडे जास्त पैसे मागितले. पण सोहेलने जादा पैसे द्यायला नकार दिला. तेव्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली. आणि त्यानंतर अकीलने सोहेलला मारायला सुरूवात केली. त्यानंतर रिक्षाचालक अकीलने हद्दच केली. त्याने पट्ट्याने सोहेलला मारायला सुरुवात केली. तेव्हा इतर दोन रिक्षाचालक सोहेल आणि असिफ यांनीही प्रवाशी सोहेलला मारायला सुरुवात केली. त्यानंतर याबद्ददल पोलिसांत तक्रार केली तर पुन्हा मारेन अशी धमकी अकीनले सोहेलेला दिली.

या मारहाणीची घटना कोणीतरी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आणि सोशल मीडियावर पोस्ट केली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली. शनवारी सांयकाळी 4 वाजून 20 मिनिटांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आज या प्रकरणी मुख्य आरोपी अकीलला अटक केली आहे. तर इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.