अखेर माळवाडी ग्रामपंचायत स्वतंत्र; ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश

493

शिरूरच्या बेट भागातील टाकळी हाजी ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेल्या माळवाडी (भाकरेवाडी) गावाची आता स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात येणार आहे. माळवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण प्रयत्नशील असलेले टाकळी हाजी गावाचे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ भाकरे व ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आले आहे. शासनाने माळवाडी ग्रामपंचायतीला स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून मान्यता दिल्याचे राजपत्र गुरुवारी मिळाल्याचे सोमनाथ भाकरे यांनी सांगितले.

माळवाडी ग्रामपंचायत स्वतंत्र व्हावी या मागणीसाठी पहिली ग्रामसभा माळवाडी येथे डिसेंबर 2018 मध्ये झाली. या ग्रामसभेला जवळपास 100 पेक्षा अधिक महिला व 200 पेक्षा अधिक पुरुष मंडळींनी सहभाग घेत माळवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी म्हणून पाठींबा दर्शविला. माळवाडी स्वतंत्र करायची ही ग्रामस्थांची मागणी व त्याचा शासन दरबारी पाठपुरावा भाकरे यांनी केला. हे गाव टाकळीहाजी ग्रामपंचायतमध्ये ऑनलाईन दिसावे याकरता सातत्याने प्रयत्न करण्यात आले. टाकळी हाजी ग्रामपंचायतीतून माळवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी म्हणून जोरदार प्रयत्न व पाठपुरावा करणारे विभाजनाचे खरे शिल्पकार ग्रा.पं. सदस्य सोमनाथ भाकरे आणि त्यांना योग्य वेळी मोलाची साथ दिलेले जेष्ठ नेते सोपानराव भाकरे, प्रकाशशेठ भाकरे, जयवंतराव भाकरे, लहुशेठ भाकरे ,दौलत पांढरकर व अनेक मान्यवर ग्रामस्थ यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे व सहकार्याने माळवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत होण्याच्या प्रयत्नांना यश आल्याचे सोमनाथ भाकरे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या