देशभरात गेल्या काही दिवसांत महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. अशातच आता चित्रपटसृष्टीतूनही एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मल्याळम चित्रपट अभिनेत्री मिनू मुनीरने एका ज्येष्ठ अभिनेत्याबाबत धक्कादायक दावा केला आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.
अभिनेत्री मिनूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने मुकेश एम आणि जयसूर्या यांच्यावर शारीरिक शोषणाचे आरोप केले आहेत. ‘माझं शारीरिक शोषण झालं. 2013 मध्ये एका प्रोजेक्टवर काम करत असताना माझ्यावर शारीरिक आणि शाब्दिक अत्याचार झाले. तरीही सहकार्य करून काम करण्याचा प्रयत्न केला होता. पण एवढं करूनही नंतर मला शिवीगाळ करण्यात आली. त्यामुळे हे सगळं मला असह्य झालं. यावेळी मला मल्याळम इंडस्ट्री सोडून चेन्नईला जाण्यास भाग पाडलं गेलं. मी अनेकदा केरला कौमुदी या वृत्तपत्रातून या कृत्याबाबत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याबाबात आाता मला न्याय हवा आहे, असे अभिनेत्री मिनू मुनीरने पोस्टमध्ये लिहिले आहे.
दरम्यान, मिनूने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीतही तिला आलेल्या वाईट अनुभवाचा खिस्सा सांगितला. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मला वाईट अनुभव आला. मी टॉयलेटला गेले होतो आणि जेव्हा मी परत आले तेव्हा जयसूर्याने मला मागून पकडले आणि माझ्या संमतीशिवाय मला किस केलं. यावेळी मला धक्काच बसला. माझ्या सुरक्षेसाठी मी तिथून पळ काढला, असं तिने सांगितलं. अनेकदा अभिनेत्यांनी मला कामाची ऑफर देखील दिली. मात्र, त्यांचं ऐकलं तरच ते मला काम देणार होते, असंही अभिनेत्री म्हणाली.