मल्याळम ‘खो-खो’ आता मराठीत

 

मल्याळम भाषेतील गाजलेला ‘खो-खो’ चित्रपट आता मराठीत पाहता येणार आहे. अल्ट्रा झकास ओटीटी प्लॅटफॉर्मवर
5 जून रोजी ‘खो-खो’चा प्रीमियर होणार आहे.

 ‘खो-खो’ या चित्रपटाची कथा तिरुअनंतपुरममधील माजी  ऍथलीट  मारिया फ्रान्सिसभोवती फिरते. मारियाने विशिष्ट परिस्थितींमुळे राष्ट्रीय खो-खो संघात जाण्याची संधी गमावली होती. तिच्या कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ती नंतर मुलींच्या शाळेत पीटी शिक्षिकेची नोकरी स्वीकारते. ती स्वतः तिच्या करीअरमध्ये जे मिळवू शकली नाही ते विद्यार्थिनींसाठी मिळवण्याचा तिने कसा प्रयत्न केला याचे दर्शन या चित्रपटातून होणार आहे.