15 हेक्टरवरील गवत जळून खाक, माळढोक पक्षी अभयारण्याजवळ वणवा

 

नान्नजजवळील माळढोक पक्षी अभयारण्याजवळील अकोलेकाठी हद्दीत दुपारी लागलेल्या आगीच्या वणव्यात 10 ते 15 हेक्टर गवत जळून खाक झाले आहे. यात मोठय़ा प्रमाणावर पक्षी व जैवविध संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील प्रसिद्ध नान्नजजवळील माळढोक पक्षी अभयारण्यालगत असलेल्या ओकोलेकाठी  हद्दीत दुपारी अचानकपणे वाळलेल्या गवताला आग लागली. आग वाऱ्यामुळे झपाटय़ाने पसरत जवळपास 10-15 हेक्टरवर असलेल्या वाळलेल्या गवतात ही आग पसरली. जणू आगीचे तांडव सुरू होते. यात पक्षी, लहान कीटक, प्राणी व अमूल्य असे नैसर्गिक व जैविक संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत ही आग भडकत होती. या घटनेची माहिती सोलापूरच्या अग्निशमन दलाला कळविले नसल्याचे सांगण्यात आले.

मेडिकल दुकान जळून खाक

दुसरी घटना जुनी पोलीस लाईन येथील एका मेडिकल दुकानाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. याकरिता जवळपास 12 पाण्याच्या टँकरचा वापर करण्यात आला. डायपर व सलाईन बाटल्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या