मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा आज निकाल

2008 साली मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा उद्या गुरुवारी विशेष एनआयए कोर्टात निकाल लागणार आहे. अतिरिक्त न्यायाधीश ए के लाहोटी हा निकाल सुनावणार आहेत. भाजप माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित व इतर काही जणांविरोधात एनआयएने आरोप ठेवले असून त्यांना शिक्षा होणार की त्यांची निर्दोष मुक्तता होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी मशिदीजवळ मोटारसायकलवर बॉम्बस्फोट घडवण्यात आला. या घटनेत 6 ठार तर 100 हून अधिक जण जखमी झाले. राष्ट्रीय तपास यंत्रणेने भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठापूर, कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर पुलकर्णी यांच्याविरोधात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए), आयपीसीअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.