#MeToo ‘इंडस्ट्रीमध्ये माझ्याकडे लैंगिक सुखाची मागणी…’, मल्लिकाचा गौप्यस्फोट

100

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री मल्लिका शेरावत आगामी चित्रपटामध्ये तुषार कपूर याच्यासोबत दिसणार आहे. एकता कपूर या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावरून गायब असणाऱ्या मल्लिकाचे पुनरागमन दणक्यात झाले आहे. एका मुलाखतीदरम्यान तिने चित्रपटनगरीतील अनेक गुपितं उघड केली आहेत.

‘स्पॉटबाय’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मल्लिकाने बॉलिवूडची काळी बाजू समोर आणली आहे. अभिनेत्यांसोबत डेट करत नसल्याने मी अनेक चित्रपट गमावले होते, असे मल्लिकाने मुलाखतीत सांगितले. इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेते आणि दिग्दर्शक, निर्मात्यांची आपल्या गर्लफ्रेंडसोबत चित्रपटात काम करण्याची इच्छा असते. परंतु मी असे करत नसल्याने अनेक चित्रपटातून मला काढून टाकण्यात आले होते, असा गौप्यस्फोट मल्लिकाने केली आहे.

मीटू कॅम्पेनबाबत बोलताना मल्लिका म्हणाली की, इंडस्ट्रीमध्ये माझ्याकडे कधी लैंगिक सुखाची मागणी झाली नाही. मी एक बोल्ड अभिनेत्री असल्याने माझ्याकडे अशी मागणी करण्याची कोणाची हिंमत झाली नसेल. मीटू कॅम्पेन आश्वासक पाऊल आहे. यामुळे काम करताना अधिक सुरक्षित वाटू शकते. तसेच यामुळे प्रत्येकावर जबाबदारी वाढल्याचेही ती म्हणाली.


View this post on Instagram

Kala Chasma

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on

आपली प्रतिक्रिया द्या