आंगणेवाडी भराडी देवी मंदिर भाविकांसाठी खुले, नियमांचे पालन करण्याचे आवाहन

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत देवीचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. कोरोना काळात गेले आठ महिने शासनाच्या निर्देशानुसार मंदिर भाविकांसाठी बंद होते.

मंदिर खुले झाल्याने आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकानी कोरोना संबंधित शासनाने जाहीर केलेल्या सर्व खबरदारी नियमांचे पालन करावे. त्याच प्रमाणे आंगणे कुटुंबीय यांनी नेमलेल्या स्वयंसेवकांनी केलेल्या सूचनांचे पालन करूनच मंदिरात प्रवेश करावे. असे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

भाविकांनी दर्शनास येताना कोणतेही पूजा साहित्य, ओटी, प्रसाद वैगरे आणू नये तसेच मंदिरात ठेवू नये. मंदिरात देवीच्या होणाऱ्या विविध धार्मिक विधी साठी  दर्शन बंद ठेवण्याचा अधिकार आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी यांचा असेल असे या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या