मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकार लवकरच पडेल, ममता बॅनर्जी यांचं वक्तव्य

मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकार लवकरच पडेल, असं वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. गुरुवारी पश्चिम बंगाल विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला. भारतीय जनता पक्ष (BJP) आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. या हाणामारीनंतर भाजप आमदार आणि मुख्य प्रतोद शंकर घोष यांच्यासह पाच आमदारांना सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करण्यात आले. याच गोंधळानंतर बोलताना त्या असं म्हणाल्या आहेत.

ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की, “भाजप हा भ्रष्ट लोकांचा आणि मत चोरांचा पक्ष आहे. त्या म्हणाल्या की, भाजपने आमच्या खासदारांना त्रास देण्यासाठी सीआयएसएफचा वापर कसा केला, हे आम्ही संसदेत पाहिले. बंगालमध्ये असा दिवस नक्कीच येईल जेव्हा पश्चिम बंगाल विधानसभेत भाजपचा एकही आमदार नसणार. लोक भाजपला मतदान करणार नाहीत.”

मता बॅनर्जी म्हणाल्या की, फक्त काही दिवस वाट पहा, लोक भाजपला सत्तेवरून हाकलून लावतील. मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकार लवकरच पडेल, असेही त्या म्हणाल्या.