ममता बॅनर्जी दरवर्षी मला कुर्ते, मिठाई पाठवतात;  मोदी यांची माहिती

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

विरोधी पक्षाचे अनेक नेते माझे चांगले मित्र आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दरवर्षी मला दोन कुर्ते आणि मिठाई पाठवतात अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. पंतप्रधानांच्या या खुलाशामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. रोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या अशा वातावरणात प्रसिद्ध अभिनेता अक्षयकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. पंतप्रधान निवासस्थानी घेतलेली मुलाखत अराजकीय आहे. राजकारणविषयक कोणतेही प्रश्न-उत्तरे नसलेल्या या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी जीवनातील विविध पैलू उलगडून दाखवले आहेत.

राहुल गांधी यांचा शेरोशायरीतून मोदींवर निशाणा

 ‘हकीकत रूबरू हो तो अदाकारी नहीं चलती. जनता के सामने, चौकीदार…मक्कारी नहीं चलती’ अशी शेरोशायरी करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अभिनेता अक्षयकुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अराजकीय मुलाखत घेतली. यामध्ये त्यांनी मोदी यांच्या व्यक्तिगत जीवनापासून त्यांच्या आवडीनिवडीविषयी प्रश्न विचारले होते. ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राहुल गांधी यांनीदेखील ‘हकीकत रूबरू हो तो अदाकारी नहीं चलती. जनता के सामने, चौकीदार…मक्कारी नहीं चलती’  असा शेअर ट्विट केला आहे. सोबत ‘चौकीदार चोर है’ हा हॅशटॅगही कापरत मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.