शासकीय तंत्रनिकेतनात चोरी करणारा पोलीस कोठडीत

30

सामना प्रतिनिधी । नांदेड

शासकीय तंत्रनिकेतनच्या वस्तीगृहात पंखे चोरी करताना पकडण्यात आलेल्या एकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी.व्ही. सिरसाट यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

३० मे रोजी दुपारी १२.३० वाजता वस्तीगृहात ठेवलेले पंखे किंमत ३२ हजार रुपयांचे चोरून नेतांना शेख रजाक शेख मोईन यास पकडण्यात आले. याबाबत विशाल बळीराम गजभारे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला . या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार मारोती तेलंग यांच्याकडे होता. ३१ मे रोजी मारोती तेलंग आणि त्यांचे सहकारी पोलीस अविनाश पांचाळ यांनी शेख रजाक शेख मोईनला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी देण्यासाठी सरकारी वकिल अॅड संजय देशमुख यांनी केलेली विनंती मान्य करून न्यायाधीश सिरसाट यांनी शेख रजाकला दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या