वर्गणीच्या वादातून डोक्यात घातला कुऱ्हाडीचा घाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणपती वर्गणीच्या वादातून दोघांनी एकाच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना 1 सप्टेंबरला उत्तमनगरमधील मोरे एम्पायर इमारतीत घडली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून अल्पवयीनाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जीवन सुरेश पवार (वय 20 रा. उत्तमनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. चंद्रकांत मोरे (वय 44, रा. वडगाव बुद्रुक ) असे जखमीचे नाव असून त्यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर परिसरात गणपती बसविण्यासाठी जीवन आणि साथीदार हे वर्गणी मागण्यासाठी मोरे इमारतीत गेले होते. त्यावेळी जीवन आणि चंद्रकांत यांच्यात वाद झाला. त्याच रागातून जीवनने अल्पवयीनाच्या मदतीने चंद्रकांत यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून जखमी केले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे तपास करीत आहेत.