गर्दी पांगवण्यासाठी गेलेल्या एकाला बेदम मारहाण

379

घरासमोर येणाऱ्या लोकांना गर्दी करू नका म्हणत गर्दी पांगवायला गेलेल्या एकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 26) सकाळी चाकण येथे घडली. दिगंबर बळीराम घोगरे (वय 55, रा. आंबेडकर नगर, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजय दादाभाऊ गोवणे (रा. आंबेडकर नगर, चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी आरोपी सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरासमोर अंगणात थांबले होते. त्यावेळी त्यांच्या घरासमोर नागरिकांची गर्दी होऊ लागली. नागरिक गर्दी करून भांडणे करू लागले. त्यामुळे फिर्यादी यांनी लोकांना भांडणे करू नका, असे सांगितले. त्यावेळी आरोपी याने फिर्यादी यांना ‘तू माझे गि-हाईक का हुसकावून देतो’ असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांच्या ओठाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या आईला देखील शिवीगाळ केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या