बोक्याची करामत; महिला झाली प्रेग्नंट..वाचा सविस्तर…

118457

घरामध्ये लहान पाहुण्याचे आगमन होणार, याची चाहूल लागताच सर्वांनाच आनंद होतो. मात्र एका व्यक्तीने आपली पत्नी घरातील बोक्यामुळे गरोदर झाली असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. मात्र, हे खरं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘रेडिट‘वर टिफू नावाच्या एका यूजरने याबाबत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

टिफूने याबाबत पोस्ट शेअर करत सांगितलं की, ‘माझ्या घरातील बोक्यामुळे माझी पत्नी गरोदर झाली.’ या जोडप्याला एक मुलगी आहे. हे दोघे कोरोना संकट संपल्यानंतर दुसऱ्या बाळाबद्दल विचार करत होते. मात्र, अचानक पत्नी गरोदर झाल्याचे समजल्याने आपल्याला धक्का बसला. टिफूने सांगितलं की, त्याची पत्नी काही काळ गर्भनिरोधक गोळ्या घेत होती. या गोळ्यांचा आरोग्यावरील दुष्परिणाम पाहता त्यांनी कंडोम वापरण्यास सुरुवात केली. कंडोम वापरूनही पत्नी गरोदर झाल्याने आपल्याला धक्का बसल्याचे तो म्हणाला.

पत्नीच्या गर्भधारणाची रिपोर्ट टिफूच्या हातात आल्यानंतर तो आश्चर्यचकीत झाला. कंडोम वापरल्यानंतरही पत्नी गरोदर कशी झाली? याचा तो विचार करत होता. या रिपोर्टवर दोघांचाही विश्वास बसत नव्हता. यानंतर टिफूने घरातील ड्रॉवरमधून कंडोमचे पाकिट बाहेर काढले. यानंतर, सर्व घटना उघडकीस आली. टिफूच्या घरातील बोक्याने कंडोमच्या पाकिटाला छिद्र केले होते. ही गोष्ट या जोडप्याला माहित नव्हती. यामुळे लैंगिक संबंध दरम्यान कंडोम वापरुनही ही महिला गरोदर झाली.

 

आपली प्रतिक्रिया द्या