Video : कारच्या धडकेनंतर तिघांकडून चालकाला बेदम मारहाण, 15 लाखही पळवले

430

दिल्लीत दोन कारच्या धडकेनंतर तिघांनी चालकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. दिल्लीच्या पंजाबी बाग भागातील हा व्हिडीओ असून आरोपींनी पीडित व्यक्तीला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीच्या पंजाबी बाग भागामध्ये दोन कारची टक्कर झाली. यानंतर आरोपींनी चालकाचा पाठलाग करून त्याला मारहाण केली. आरोपींनी त्याच्या दुकानात जावून त्याला जबर मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पंजाबी पगडी घातलेले तीन जण पीडित व्यक्तीला लाथा-बुक्क्या आणि लाकडी दांडक्याने निर्दयीपणे मारताना दिसत आहेत. तसेच पीडित व्यक्तीला दुकानात आणि दुकानाबाहेर नेऊनही मारहाण करतात.

दरम्यान, आरोपींच्या मारहाणीमध्ये पीडित व्यक्ती जखमी झाला आहे. पीडित व्यक्तीच्या जिवाला धोका नसला तरी जखमा गंभीर आहेत. तसेच आरोपींनी दुकानातून 15 लाख रुपये चोरी केल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या