
मध्य प्रदेशातील कान्हा टायगर रिझर्व्हला लागून असलेल्या करेली गावात संतोष मेश्राम या 30 वर्षीय आदिवासी तरुणाने मोठय़ा धैर्याने वाघाच्या हल्ल्यातून स्वतःचा बचाव केल्याची थरारक घटना घडली. शेताकडे जात असताना अचानक समोर आलेल्या वाघाने तरुणावर हल्ला केला. संतोष मेश्रामने काठीच्या मदतीने तब्बल 15 मिनिटे वाघाचा सामना केला.























































