उत्तर प्रदेशमध्ये तरुणीचे अपहरण करून बलात्कार, जखमी अवस्थेत सोडून आरोपी फरार

उत्तर प्रदेशमध्ये एका नराधमाने तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आहे. तसेच जेव्हा तरुणी आरोपीला विरोध करत होती, तेव्हा आरोपीने तिला जबर मारहाण केली आहे. बलात्कारानंतर आरोपीने पीडित तरुणीला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयाच्या जवळ सोडले आणि तिथून पळ काढला.

उत्तर प्रदेशच्या फतेहपुरी जिल्ह्यात एक तरुणी छोटेसे दुकान चालवत होती. तेव्हा मंगळवारी रात्रीच्या सुमारास पंडित महाराज नावाचा व्यक्ती आला आणि त्याने तरुणीशी बोलण्यास सुरूवात केली. पंडित महाराजने तरुणीला फसवून आपल्या घरी नेले. त्याची बायको पुजेसाठी बाहेर गेली होती. तेव्हा पंडित महाराजने तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरूवात केली. तरुणीने पंडित महाराजला विरोध केला, परंतु त्याने तरुणीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत  तरुणी जबर जखमी झाली.

बलात्कार झाल्यानंतर आरोपी पंडित महाराजने तिला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयाबाहेर सोडले आणि तिथून पळ काढला. याबाबत पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच पीडित तरुणीला रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहे. तसेच पोलीस आरोपी पंडित महाराजचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या