गर्भवतीच्या पोटात मारली लाथ, आरोपीला तीन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा

703

चुलत बहीण गरोदर असताना तिच्या पोटावर भावाने लाथ मारली. त्यात अर्भकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोर्टाने आरोपीला तीन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा दिली आहे.

विद्या (नाव बदलेले) ही 2017 मध्ये चार महिन्यांची गरोदर होती. विद्या आपले वडील आई आणि बहीणीसोबत भांडूपमध्ये राहत होती. 16 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता विद्याचा चुलत भाऊ मनोज कराखे आणि त्याची बायको विद्याशी पाणी भरण्यावरून भांडले. वाद चांगलाच विकोपाला गेला. मनोज आणि त्याच्या बायकोने विद्याला शिवीगाळ केली. नंतर मनोजने विद्याच्या पोटावर जोरदर लाथ मारली. विद्या जागीच बेशुद्ध पडली. विद्याला तिच्या पतीने आणि आईने जवळच्या इस्पितळात दाखल केले. डॉक्टरांना जेव्हा कळाले की विद्या चार महिन्याची गरोदर आहे, तेव्हा तिला सायन इस्पितळात हलवण्यात आले. सोनोग्राफीनंतर काळाले की विद्याच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाला आहे.

विद्याने मनोज कराखेच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली. मंगवळवारी न्यायालयाने मनोज कराखेला 3 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या