चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची केली हत्या, तीन मुलं झाली पोरकी

881

चारीत्र्याच्या संशयावरून एका पतीने त्याच्या पत्नीचा निर्घृणपणे खून करून तिचा मृतदेह जाळल्याची घटना राहाता तालुक्यातील एकुरखे गावात घडली पत्नीचा मृतदेह जाळल्यानंतर पती पोलीस ठाण्यात शरण आला. या प्रकरणी पती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहीती अशी की सुनील जनार्दन लेंडे हा एकुरखा शिवारात राहात होता. त्याचे 2008 साली छाया हिच्यासोबत लग्न झाले होते त्यांना तीन मुलं देखील आहेत. सुनील हा छायाच्या चारित्र्यावर संशय घेत होता त्यातून त्यांच्यात नेहमी वाद होत असत. अनेक वेळा तिच्या नातेवाईकांनी दोघांचे वाद मिटविले. शनिवार दि 22 फेब्रुवारी रोजी पती सुनील याने त्याचे आई वडील यांना रूई येथे नातेवाईक वारले असून तुम्ही मुलांना घेऊन जा असे सांगून त्यांना पाठवून दिले.त्यानंतर तो पत्नी छायाला घेऊन शेतात गेला. तिथे लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यात वार करून तिला जिवे मारले. तिला मारल्यानंतर सुनील घरी आला व रात्री पुन्हा शेतात गेला. त्यानंतर त्याने छायाचा मृतदेह पोत्यात भरून मोटारसायकल वरून नपावाडी रोडला नेऊन रस्त्याच्या कडेला पेट्रोल टाकून तिला पेटवून दिला. तेथून निघून तो रात्री 10 वाजेच्या सुमारास थेट राहाता पोलीस ठाण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मयत छायाचा जळालेला मृतदेह पंचनामा करून ताब्यात घेत लोणी येथे दवाखान्यात पाठविला.

या घटनेची फिर्याद मयत छायाचा भाऊ सतिश तरस याने राहाता पोलीसांत दिली त्यावरून राहाता पोलीसांनी पती सुनिल याच्या विरूध्द भादवी कलम 302, 201 नुसार गुन्हा दाखल केला.या गुन्हाचा तपास पो नि सुभाष भोये हे करत आहे.आरोपीला कोपरगांव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या