गाडीला कट का मारला म्हणत पिस्तूलाच्या धाकाने मोटार चोरली, हडपसर परिसरातील घटनेने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधिक

गाडीला कट का मारला म्हणत दुचाकीस्वार चोरट्याने मोटारचालकाला पिस्तूलाचा धाक दाखवून ताब्यातील मोटार चोरून नेली. ही घटना हडपसर परिसरातील मोरे वस्ती ते भापकर मळा रस्त्यावर घडली.

याप्रकरणी गणेश भडलकर (वय 42, रा. कोलवडी, हवेली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. काल रात्री साडेदहाच्या सुमारास गणेश हे हडपसर परिसरातून मूळगावी कोलवडीला चालले होते. त्यावेळी मोरे वस्ती ते भापकर मळा रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी त्यांना पिस्तूलाचा धाक दाखविला.

गाडीला कट का मारला अशी विचारणा करून त्यांना थांबवून पिस्तूलाचा धाक दाखविला. त्यानंतर त्यांच्याकडील मोटार चोरून नेली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने तपास करीत आहेत.