एका लग्नाची अजब गोष्ट! एकाच मंडपात केला दोघींशी विवाह; एक ‘लव्ह’ तर दुसरे ‘अरेंज’

3196

मध्यप्रदेशमधील बैतुल येथे एक अजब दृश्य पाहायला मिळाले. येथे एकाच मंडपात तरुणाने प्रेयसीशी आणि घरच्यांनी ठरवलेले तरुणीशी विवाह केला. या लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरत आहे. याबाबत ‘आज तक’ने वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, व्हायरल होणारा हा व्हिडीओ बैतुल जिल्ह्यातील घोडाडोंगरी तालुक्यातील सलैया गावातील आहे. 29 जूनला हा अनोखा विवाह सोहळा पार पडला. आदिवासी तरुणाने एकाच मंडपाखाली प्रेयसी आणि घरच्यांनी ठरवलेल्या तरुणीसोबत लग्न केले. यावेळी तिन्ही कुटुंबीय आणि गावकरी उपस्थित होते. तरुणाचे नाव संदीप असून त्याने होशंगाबाद जिल्ह्यातील सुनंदा नावाच्या आणि घोडाडोंगरी तालुक्यातील कोयलारी गावच्या शशिकला नावाच्या तरुणीशी विवाह केला.

हा तरुण भोपाळला आयटीआयचा अभ्यास करत असताना होशंगाबाद जिल्ह्यातील सुनंदा हिच्याशी त्याची ओळख झाली आणि दोघांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. याच दरम्यान घरच्यांनी त्याचे लग्न कोयलारी गावच्या तरुणीशी ठरवले. यामुळे पेच निर्माण झाला. अखेर गावातील ज्येष्ठ नागरिकांनी कुटुंबियांशी सल्लामसलत करून दोघींचा संदीपसोबत विवाह लावून देण्याचा सल्ला दिला आणि 29 जूनला हा अनोखा विवाह पार पडला.

आपली प्रतिक्रिया द्या