रणगाडा उद्ध्वस्त करणाऱ्या ‘अँटी टँक गायडेड मिसाईल’ची यशस्वी चाचणी

एकीकडून पाकिस्तान आणि दुसरीकडे चीन अशी दोन कुरापती राष्ट्र शेजारी असल्याने हिंदुस्थान आपले लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे आधुनिकीकरण करण्यावर भर देत आहे. बुधवारी युद्धपरिस्थितीमध्ये शत्रूचा सामान करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘अँटी टँग गायडेड मिसाईल’ची (Man Portable Antitank Guided Missile) यशस्वी चाचणी घेण्यात आली. आंध्र प्रदेशमधील कुर्नुलमध्ये ही यशस्वी चाचणी घेण्यात आली. या मिसाईलची ही तिसरी यशस्वी चाचणी आहे.

युद्धजन्य परिस्थितीमध्ये ‘अँटी टँग गायडेड मिसाईल’चे (Man Portable Antitank Guided Missile) लष्कराच्या दृष्टीने मोठे महत्व आहे. शत्रूराष्ट्राच्या रणगाड्यांना उद्ध्वस्त करण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे. बुधवारी याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. एका ट्रायपॉडच्या सहाय्याने मिसाईल लॉन्च करण्यात आले आणि मिसाईलने काही क्षणात नकली रणगाड्याला अचूक लक्ष्य केले.

‘अँटी टँग गायडेड मिसाईल’ (Man Portable Antitank Guided Missile) खांद्यावर घेऊन लष्करी जवान अचून निशाणा साधू शकतात. या मिसाईलची रेंज 4 किलोमीटरपर्यंत आहे. ‘नाग’ मिसाईल सिरीजमधील हे एक मिसाईल आहे. दुर्गम भागात याचा वापर करून शत्रूच्या रणगाड्यांना आणि ठिकाणांना उद्ध्वस्त करता येणार आहे. यामुळे लष्कराची क्षमता वाढली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या