
खाज आल्यावर ती जाईपर्यंत बहुसंख्य मंडळी अस्वस्थ झालेली असतात. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये एका माणसाने पाठीला आलेली खाज हाताने आणि पंचाने दूर न झाल्याने चक्क जेसीबीच्या फावड्याने खाजवून दूर करण्याचा प्रयत्न केला. या व्हिडीओवर सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

























































