मॅनVsवाईल्ड : मोदींचे हिंदी बेअर ग्रिल्सला समजले तरी कसे? पंतप्रधानांनी केला खुलासा

डिस्कवरी चॅनेलवर साहसवीर बेयर ग्रिल्स आणि हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ (man vs wild) शो 12 ऑगस्ट रोजी प्रसारित झाला. तेव्हापासून हा शो सोशल मीडियावर कायम चर्चेत आहे. आतापर्यंत जवळपास 400 कोटी व्ह्यूज मिळालेल्या या शोमध्ये पंतप्रधान मोदी बेअर ग्रिल्ससोबत हिंदीमध्ये बोलताना दिसतात. हा शो प्रदर्शित झाल्यापासून सर्वांना प्रश्न पडला होता की मोदींचे हिंदी बेअर ग्रिल्सला नक्की समजले तसे कसे? आता या प्रश्नाचे उत्तर खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच दिले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ (man vs wild) शो प्रसिद्ध झाल्यापासून अनेक लोक माझे हिंदी बेअर ग्रिल्सला समजले तरी कसे हे जाणून घेण्यास इच्छूक आहेत. अनेकांनी हा शो एडिट केला गेलाय का किंवा हा शो अनेकवेळा शूट केला गेलाय का, असाही सवाल विचारला जात होता. तसेच माझ्या आणि बेअर ग्रिल्समधील संवादात तंत्रज्ञानाने सर्वात मोठी भूमिका निभावली आहे. एक कॉरडलेस डिव्हाईस बेअर ग्रिल्सच्या कानामध्ये जोडण्यात आले होते. हे डिव्हाईस खूपच कमी काळात हिंदीचे इंग्रजीमध्ये ट्रान्सटेल करत होते, असा खुलासा पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.

सुपरहिट शो
12 ऑगस्टला प्रसिद्ध झालेला हा शो देशातच नाही तर जगात सुपरहिट ठरला आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रेंड करणारा शो बनला आहे. या शोला जगभरातून 360 कोटींहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. मोदींच्या या एपिसोडने प्रसिद्ध शो सुपर बाउल 53 ला मागे टाकले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या