बुरखा घालून तरुणींशी छेडछाड करत होता रोडरोमियो, लोकांनीच केला पर्दाफाश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुरखा परिधान करून कॉलेजच्या तरुणींशी छेडछाड करणाऱ्या तरुणाला लोकांनी पकडल्याची घटना उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथे घडली आहे. लोकांनी या रोडरोमियोला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.

विशेष म्हणजे, आधी पोलीसही काही वेळ बुरखाधारी व्यक्ती ही तरुणी असल्याचं समजून गोंधळात होते. पण, बुरख्याआडून पुरुषाचा आवाज आल्यानंतर तो बुरखा उतरवला गेला. तेव्हा त्यात पुरुष असल्याचं दिसून आलं.

हा तरुण नजीबबाद मोहल्ल्यातील पठानपुरा इथला रहिवासी असून त्याचं नाव सुहैल असं आहे. सुहैल गेल्या तीन दिवसांपासून बुरखा, नकाब घालून महाविद्यालयाबाहेर उभा राहत होता. बुरखा घातल्याने त्याला कुणी ओळखलं नाही. तो महाविद्यालयाबाहेर उभं राहून तो तरुणींची छेड काढत होता.

त्याला छेड काढत असताना काही लोकांनी पाहिलं आणि त्याला पकडून पोलिसात घेऊन गेले. पोलीसही आधी बुरखा पाहून चक्रावले. त्यांनी तरुणी समजून त्याला ताब्यात घेतलं नाही. पण त्याची चौकशी करत असताना त्याचा आवाज ऐकला आणि तो बुरखाधारी पुरुष असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मग त्याचा बुरखा उतरवण्यात आला.